Background

Logo Design

entry image

Logo Design

एखाद्या व्यवसायाची किंवा उत्पादनाची ओळख निर्माण होण्यामध्ये ‘लोगो’चा मोठा वाटा असतो. आकर्षक आणि उठावदार लोगो लोकांच्या मनावर उत्तम परिणाम साधतात. लोगो म्हणजे नक्की काय? शब्दशः अर्थ घ्यायचा झाला तर बोधचिन्ह किंवा मानचिन्ह. परंतु एका शब्दात ओळख द्यावी, एवढे लोगोचे महत्व नक्कीच कमी नाही. लोगो ही तुमच्या बिझनेसची पहिली ओळख मानली जाते. ज्याप्रमाणे कंपनीचे नाव त्या कंपनीसाठी महत्वाचे असते, त्याचप्रमाणे उत्तम लोगो हाही तेवढाच महत्वाचा असतो. एखादा ब्रँड प्रसिद्ध होण्यातही लोगो महत्वाची भूमिका बजावतो. फक्त उत्पादन नाही, तर विविध सेवा (services) देणाऱ्या कंपनीही ब्रँड म्हणून नावाजल्या जातात. ब्रँडेड वस्तू आणि सेवा ग्राहकांचा खास विश्वास संपादन करतात. जेव्हा एखादा ब्रँड लोकांच्या पसंतीस उतरतो, तेव्हा त्याचे मूल्य इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा जरी जास्त असले तरीही ग्राहकांकडून त्यास प्राधान्य देण्यात येते.

विविध क्षेत्रातली प्रसिद्ध उत्पादने आठवून पाहिली असता त्या उत्पादनांच्या नावासोबत त्यांचा लोगोही डोळ्यासमोर आल्याशिवाय राहात नाही! एखादे शीतपेय, गाड्यांचा एखादा प्रसिद्ध ब्रँड, एखादे हॉटेल, कपड्यांचा ब्रँड, चॉकलेट, साबण, टूथपेस्ट आणि अशी रोजच्या वापरातली असंख्य उत्पादने आठवून पहा. आपल्याला हे जाणवेल की कंपनीचे नाव दृष्टीस न पडता केवळ लोगो जरी समोर आला तरी तो बघून ते उत्पादन किंवा त्या कंपनीचे नाव डोळ्यासमोर येतेच. उत्पादन लोकप्रिय होण्यात आणि व्यवसायाची वाढ होण्यासाठीही लोगो महत्वाचा ठरतो.

आपल्या कंपनीचा लोगो नक्की कुठे कुठे प्रदर्शित होतो? तर आपल्या कंपनीचे नाव जिथे जिथे डिस्प्ले होते त्या प्रत्येक ठिकाणी लोगो दाखवता येऊ शकतो. सर्व प्रकारच्या जाहिराती, डिजिटल मार्केटिंग, सोशल मिडियावर होणारी प्रसिद्धी, कंपनीची वेब साईट यांसारख्या प्लॅटफॉर्मवर तसेच विविध प्रकारची स्टेशनरी तसेच प्रिंटेड मटेरियल जसे, लेटरहेड, एन्व्हलप, फ्लायर्स आणि ब्रोशर्स, बॅनर्स किंवा फ्लेक्स आणि याच प्रकारे इतर कुठल्याही मार्केटिंग मटेरियल्सवर कंपनीच्या नावासमवेत लोगो जोडला जातो.

असे म्हणतात की हजारो शब्दांमधून जे सांगता येत नाही, ते एका चित्रामधून व्यक्त करता येते. खरेच आहे. चित्र किंवा चिन्हांच्या माध्यमातून भावना चटकन व्यक्त करता येतात. याच कारणाने एखादे लहानसे चिन्ह किंवा चित्र (graphics) यांचा वापर लोगो म्हणून केला जातो. अर्थात, लोगो म्हणजे केवळ चित्र किंवा चिन्हंच असते असेही नाही. लोगो अनेक प्रकारचे असू शकतात. ग्राफिक्स, भौमितीय आकार, टेक्स्ट (अक्षरे किंवा शब्द), चिन्ह (symbol) यांच्या किंवा यांच्या कॉम्बिनेशनच्या रुपात आपल्याला लोगो बघायला मिळतात. कंपनीचे नाव, उत्पादन, एखादे स्थान, असे विविध घटक लोगोमधून परावर्तीत होत असतात. आपल्या आवश्यकतेनुसार आणि आवडीनुसार वैशिष्ट्यपूर्ण लोगो डिझाईन करता येऊ शकतात. अगदी साध्या सुटसुटीत डिझाईनपासून गुंतागुंतीच्या वैविध्यपूर्ण डिझाईन्स पर्यंत अनेक प्रकार अन पॅटर्न्सचे लोगो बनवता येऊ शकतात. विविध रंगछटा आणि फॉन्ट्स वापरून हे लोगो अधिक आकर्षक बनवता येतात.

पुण्यातील सर्वोत्तम advertising services देणारी कंपनी 'त्रिमितीय स्टुडिओज प्रा. लि.', लोगो डिझायनिंगसाठीही वाखाणली गेली आहे. आपल्याला सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आम्ही नेहेमीच तत्पर आहोत. आमच्या क्लाएंट्सच्या गरजा व अपेक्षा ओळखून आम्ही त्यांना लोगोच्या डिझाईन्सचे मुबलक पर्याय प्रदान करतो. वैविध्यपूर्ण, सुटसुटीत, आकर्षक, सुसंगत लोगो डिझाईन्ससाठी एकच अग्रगण्य नाव म्हणजे 'त्रिमितीय प्रा. लि.' आमचे संतुष्ट क्लाएंट्स व त्यांच्यासाठी आम्ही डिझाईन केलेले वैशिष्ट्यपूर्ण लोगोज बघण्यासाठी येथे जरूर क्लिक करा -

Logo designs

WHEN THEY SPEAK ABOUT US...

Our Happy Clients