Background
entry image

उत्तम वेबसाईट - काळाची गरज

इंटरनेट आणि वेबसाईट

आजचे युग हे इंटरनेटचे युग मानले जाते. अगदी लहान मुलांपासून जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जण इंटरनेट हाताळू लागले आहेत. दिवसेंदिवस इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत वाढ होत आहे. इंटरनेट आणि वेबसाईटचा वापर तर सर्व जण करत असतात. पण इंटरनेट किंवा वेबसाईट म्हणजे नक्की काय? बऱ्याचदा इंटरनेट म्हणजेच वेबसाईट असा एक समज दिसून येतो. परंतु इंटरनेट आणि वेबसाईट हे एक नव्हेत. इंटरनेट हे जगातील सर्वात मोठे नेटवर्क असून इंटरनेट कनेक्टिव्हिटी असणारा प्रत्येक कंप्यूटर या नेटवर्कचा हिस्सा आहे.

Text आणि multimedia यांचा समावेश असणाऱ्या वेब पेजेसचा समूह अशी वेबसाईटची साधी सोपी व्याख्या सांगता येईल. ही वेब पेजेस एकमेकांशी संलग्न असतात. पब्लिक किवा प्रायव्हेट प्लॅटफॉर्मवर या वेबसाईट प्रसृत केल्या जातात. इंटरनेटच्या माध्यमातून आपली वेबसाईट जगभर पोहोचू शकते. वेबसाईटचे अनेक प्रकार आणि उद्देश असू शकतात. एखाद्या विषयाची निव्वळ माहिती देणाऱ्या वेबसाईट पासून ऑनलाईन खरेदी विक्रीपर्यंत अनेक प्रकारच्या वेबसाईट आपल्याला बघायला मिळतात. Text बरोबरच multimedia objects जसे फोटो, व्हिडीओ, ऑडीओ यांचा समावेश केल्याने वेबसाईट अधिक आकर्षक व उठावदार बनते. बदलत्या काळाबरोबर बदलत राहणे हे सर्वांसाठीच गरजेचे असते. Actual presence बरोबरच virtual presence सुद्धा तितकाच महत्वाचा असतो.

Url म्हणजे वेबसाईटचा पत्ता व वेबसाईटला दिलेले युनिक नाव म्हणजे डोमेन नेम (domain name). आपल्या व्यवसायाच्या नावाचे डोमेन नेम निवडून ते उपलब्ध असल्यास त्याची नोंदणी करणे आवश्यक ठरते. .com या कॉमन व प्रसिद्ध एक्स्टेन्शन सह .in, .org, .edu अशी विविध एक्स्टेन्शन्स सुद्धा उपलब्ध असतात. वेबसाईटचा सर्व डेटा जिथे साठवला जातो त्याला वेब सर्वर म्हणतात. प्रत्येक सर्वरला एक युनिक IP ऍड्रेस असतो.

वेबसाईट असणे गरजेचे का आहे?

एखाद्या व्यावसायिकासाठी त्याची वेबसाईट हे व्यवसायाच्या वाढीसाठी, प्रसिद्धीसाठी, जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे एक उत्तम माध्यम असते. एक उत्तम वेबसाईट ही आपल्या व्यवसायाची ओळख मानली जाते. वेबसाईटच्या माध्यमातून सर्व स्तरातल्या ग्राहकांपर्यंत पोहोचणे सोपे जाते. ग्राहक बसल्या जागी, आपल्या सोयीस्कर वेळेनुसार ही माहिती पाहू शकतात तसेच चट्कन संपर्क साधू शकतात.

कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅबलेट किंवा स्मार्टफोन... डिव्हाईस कुठलंही असलं तरी त्याला सुसंगत (compatible) असणारी वेबसाईट तयार करता येते. याचा फायदा हा मिळतो की सर्व प्रकारच्या, सर्व वयोगटातल्या ग्राहकांपर्यंत तुम्ही एका क्लिकद्वारे पोहोचू शकता. केवळ वेबसाईट तयार करणेच नाही, तर वेळोवेळी ती अपडेट ठेवणेही तेवढेच महत्वाचे असते. उत्कृष्ट वेबसाईट, वेबसाईटचा मेंटेनन्स यांसाठी खात्रीचे नाव म्हणजे 'त्रिमितीय स्टुडिओज प्रा. लि.'

WHEN THEY SPEAK ABOUT US...

Our Happy Clients