Background

कल्पनांना प्रत्यक्षात उतरविणारे ग्राफिक्स!

entry image

कल्पनांना प्रत्यक्षात उतरविणारे ग्राफिक्स!

ग्राफिक डिझायनिंग... आजच्या काळात अत्यंत महत्वाची असणारी ही गोष्ट. मुळात ग्राफिक्स म्हणजे काय? एखादे चित्र? आकार? आकृती? रंग? रेखाचित्र? की हे सर्वच? सामान्यतः कमर्शिअल, फाईन, कम्युनिकेशन आर्ट म्हणजे ग्राफिक डिझाईन असे म्हणता येईल. वर उल्लेख केलेले सर्व घटक, टेक्स्ट तसेच फोटो या सर्वांचा समावेश ग्राफिक डिझाईनमध्ये होतो. आपल्याला ग्राफिक डिझाईन्स कुठे बघायला मिळतात? थोडा विचार करुया. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत संपूर्ण दिवसभरात आपल्या आसपास असणाऱ्या सर्व घटकांना विचारात घ्या. आपल्याला सर्वत्र ग्राफिक्स दिसून येतील. आपल्या टूथपेस्टचे आवरण असो किंवा दुधाची पिशवी, वर्तमानपत्र असो किंवा मोबाईलवर आपण पहात असणाऱ्या बातम्या, दिवसभरात आपण वापरत असणारी असंख्य उत्पादने, रस्त्यावर लावली जाणारी होर्डिंग्ज, वेब साईट्स, व्हिजिटिंग कार्ड्स, पॅम्प्लेट्स किंवा ब्रोशर्स, ग्रीटिंग्ज, सोशल मीडिया, टेलिव्हीजन अॅड्स आणि अजून कितीतरी गोष्टी... या सर्व गोष्टी ग्राफिक्सशिवाय अपूर्ण आहेत. या सर्वच गोष्टींमधून ग्राफिक्स वजा केले तर त्या निरस वाटू लागतील.

ग्राफिक्स म्हणजे काय हे तर आपण इथे बघितलं पण 'ग्राफिक डिझाईन' हे अत्यावश्यक का ठरते? ग्राफिक्स शिवाय आपल्या आयुष्याची कल्पना करता येईल का? ग्राफिक्स हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. असं म्हणतात की एखादी गोष्ट समजावून देण्यात जिथे हजारो शब्द खर्च करावे लागतात तीच गोष्ट एक चित्र सहजपणे समजावून देते. हे खरेच आहे. रंग, रेषा, आकार, फोटो यांच्या माध्यमातून आपल्या भावना चट्कन दर्शवताता येतात. दैनंदिन व्यवहारात ज्या ग्राफिक्सला एवढे महत्व आहे, ते तुमच्या व्यवसायासाठी तर निश्चितच एक अतिशय महत्वाचा घटक आहे.

आकर्षक रंगसंगती, बोलकी डिझाईन्स तुमच्या व्यवसायाची ओळख बनून जातात. तुमच्या कंपनीचा लोगो, वेबसाईट, व्हिजिटिंग कार्ड, ब्रोशर व इतर अनेक ठिकाणी ही ग्राफिक्स आवश्यक घटक ठरतात. 'त्रिमितीय स्टुडिओज' मधे तुम्हाला वेगळं काय मिळतं? आम्ही तुमची गरज संपूर्णपणे समजून घेतो आणि तुमच्यासाठी सर्वोत्तम डिझाईन्स बनवतो. अशी डिझाईन्स जी एका दृष्टीक्षेपात आपला हेतू स्पष्ट करतात. आमच्या क्लाएंटसच्या समाधानामध्येच आमचे समाधान आहे. आपणास उत्तम पर्याय देणे हे आमचे कर्तव्य आहे. ग्राफिक्स संबंधित विविध सेवा 'त्रिमितीय स्टुडिओज' तर्फे आपणास दिल्या जातात. एक दृष्टिक्षेप आमच्या सेवांवरही टाकूया...

सुरुवात करूया लोगो आणि ब्रँड आयडेंटिटीपासून. एखाद्या व्यवसायाची किंवा उत्पादनाची ओळख निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण अशा या दोन बाबी. आपला व्यवसाय किंवा उत्पादन ग्राहकांसमोर सादर करत असताना उत्तम लोगो तसेच ब्रँड आयडेंटिटी निर्माण करण्यासाठी आम्ही आपणास सर्वोत्तम पर्याय देतो. लोगो अनेक प्रकारचे असू शकतात. ग्राफिक्स, भौमितीय आकार, टेक्स्ट (अक्षरे किंवा शब्द), चिन्ह (symbol) यांच्या किंवा यांच्या कॉम्बिनेशनच्या रुपात आपल्याला लोगो बघायला मिळतात. कंपनीचे नाव, उत्पादन, एखादे स्थान, असे विविध घटक लोगोमधून परावर्तीत होत असतात. आपल्या आवश्यकतेनुसार आणि आवडीनुसार वैशिष्ट्यपूर्ण लोगो डिझाईन करता येऊ शकतात. विविध रंगछटा आणि फॉन्ट्स वापरून हे लोगो अधिक आकर्षक बनवता येतात. जेव्हा आपल्या व्यवसायाची एक ब्रँड म्हणून ओळख निर्माण होते तेव्हा आपल्या व्यवसायाची यशस्वीतेकडे वाटचाल सुरू होते. आपल्या व्यवसायाची प्रभावी आणि बळकट ब्रँड आयडेंटिटी बनविण्यासाठी त्रिमितीय स्टुडिओजशी अवश्य संपर्क साधा.

लोगो आणि ब्रँड आयडेंटिटी सह इतर अनेक गोष्टींमध्ये ग्राफिक्स महत्वाची भूमिका बजावतात. प्रिंट जाहिराती असो किंवा डिजिटल जाहिराती, उत्तम डिझाईन असणारी जाहिरात नेहेमीच ग्राहकांचे लक्ष वेधून घेते. विविध क्षेत्रातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रिंट व डिजिटल जाहिराती हे एक उत्तम माध्यम आहे. या जाहिरातींबरोबरच विविध प्रकारची ऑफिस स्टेशनरी व प्रिंटेड मटेरियल जसे, व्हिजिटिंग कार्डस्, लेटरहेड, एन्व्हलप, फ्लायर्स आणि ब्रोशर्स, बॅनर्स किंवा फ्लेक्स, स्टँडी या माध्यमांच्या उत्कृष्ट ग्राफिक डिझायनिंगसाठी एकच नाव - 'त्रिमितीय स्टुडिओज प्रा. लि.' आमचे संतुष्ट क्लाएंट्स व त्यांच्यासाठी आम्ही बनविलेली विविध डिझाईन्स पाहण्यासाठी इथे क्लिक करा -

Graphic designing

WHEN THEY SPEAK ABOUT US...

Our Happy Clients